महाराष्ट्रामध्ये “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजना साठी आपण ऑनलाइन अर्ज कसा करायचा ते पाहणार आहोत.
तर सुरू करूया –
पहिली पायरी – तुम्ही प्लेस्टोरवरून नारीशक्ती दूत ॲप डाउनलोड करा.
दुसरी पायरी – मोबाईल नंबर भरा आणि त्या नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी टाका.
तिसरी पायरी – मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना क्लिक करा. फॉर्म उघडेल त्यानंतर तुम्ही नाव, पतीचे नाव, जन्मतारीख, पत्ता, बँक तपशील भरा.
चौथी पायरी – आधार कार्ड, रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक इत्यादि कागदपत्र अपलोड करा.आणि फोटो अपलोड करा.जन्म/निवास प्रमाणपत्र आणि उत्पन्न प्रमाणपत्र एवजी 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड अपलोड करू शकता.
पाचवी पायरी – महिती जतन करा वर क्लिक करा.तुमच्या मोबाईल वर ओटीपी येइल तो टाका आणि फॉर्म सबमिट करा.